रत्नागिरी : शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त पक्षाचं काम करणार असं त्यांनी जाहीर केले आहे. त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल याची चर्चा सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षातल्या तरुणांना आता संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे रामदास कदम म्हणालेत. कदम यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. पण रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुलाला संधी मिळण्यासाठी त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


कधीतरी आपण थांबले पाहिजे. आपणच किती दिवस निवडणूक लढायच्या आता आपले वय सुद्धा झाले आहे. तरुण कायकर्त्यांना संधी मिळायला हवी असे सांगत त्यांनी या पुढे आपण निवडणूक लढणार नसल्याचे पहिल्यांदाच दापोलीत जाहीर केले आहे.