पुणे : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय दोन कन्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले. साक्षी मलिक आणि पी. व्ही. सिंधू यांनी मेडल पटकावले. आज यांची नावे घेतली जात आहे. मात्र, त्यांनी त्यासाठी काय केले हे माहीत आहे का, आपण त्यांना काय देतो, अशी खंत अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोल्फ नावाचा खेळ भारतात नाही. परंतु आदीती अशोक हिने हा गेम कुठे नेऊन ठेवलाय आहे बघा. आज सगळे सिंधुचे नाव घेत आहेत. परंतु या लोकांना आपण काय देतो. चार-आठ वर्षांनी ऑलिम्पिक आल्यावर टी. व्ही. पुढे बसायचे आणि पदक मिळाल्यावर कौतुक करायचे, नाही मिळाले तर कोणी तरी काहीतरी कमेंट करायची, असे चालणार नाही, असे म्हणत नाना पाटेकर यांनी शोभा डे यांचाही समाचार घेतला.


चीनने दहा वर्ष आपले खेळाडु पाठवले नाहीत. पुढे त्यांनी 100 मेडल मिळवलित. प्रिपरेशन नावाची काही गोष्ट असते की नाही, असा सवाल उपस्थित करुन देशातील व्यवस्थेवर नाना पाटेकर
यांनी टीका केली.