शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बसवर चाप
व्यावसायिक स्पर्धेपोटी शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणा-या स्कूल बसवर चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे स्कूलबसेसची तपासणी केली जातेय. स्कूल बस चालवताना नियमांचं आणि निकषांचं उल्लंघऩ होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आरटीओने एकूण 500 बसेसची तपासणी केली
नागपूर : व्यावसायिक स्पर्धेपोटी शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणा-या स्कूल बसवर चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे स्कूलबसेसची तपासणी केली जातेय. स्कूल बस चालवताना नियमांचं आणि निकषांचं उल्लंघऩ होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आरटीओने एकूण 500 बसेसची तपासणी केली
नियमांचं उल्लंघन करणा-या स्कूल व्हॅनवर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे. नागपुरात विविध शाळांच्या सुमारे 1500 बसेस धावतात. त्यातून तब्बल 10,000 विद्यार्थी प्रवास करतात. पण स्कूलबस चालवताना अनेकदा स्कूलबसबाबतचे नियम पायदळी तुडवले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानंतर या स्कूलबस आणि स्कूल व्हॅनची कठोर तपासणी सुरू झाली आहे. अर्थात प्रत्यक्ष कॅमे-यासमोर मात्र पालक, विद्यार्थ्यांनी थेट टीका करणं टाळल्याचं दिसून आलं. तर ओव्हर स्पिडींग, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणे अशा प्रकारांनी नियमांचं उल्लंघन होत असल्याची कबुली अधिका-यांनी दिलीय.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या या स्कूल बस चालकांवर कारवाई व्हायलाच हवी. त्याकरता नियम अधिक कडक करण्याची गरज पडल्यास ते करण्याची तयारी देखील सरकारने दाखवायला हवी.