सचिन तेंडुलकरच्या हस्ते कर्तव्य उपक्रमाचं उद्घाटन
ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांना सन्माननीय वागणूक मिळण्याकरिता ‘कर्तव्य’ हा अभिनव जनजागृतीपर उपक्रम ठाणे पोलिसांनी सुरु केला आहे.
ठाणे : ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांना सन्माननीय वागणूक मिळण्याकरिता ‘कर्तव्य’ हा अभिनव जनजागृतीपर उपक्रम ठाणे पोलिसांनी सुरु केला आहे.
या उपक्रमाचं उदघाटन भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर याच्या हस्ते करण्यात आलं. ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येतोय.
१५ ऑगस्टपासून सुरू झालेला हा उपक्रम टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवला जाणार आहे. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील ज्येष्ठ नागरिकांसंबंधीची माहिती गृहनिर्माण संस्थाकडून संकलित केली जाणार असून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या मार्गदर्शनाने याकरिता प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. ‘कर्तव्य’ उपक्रमाकरिता ठाणे पोलिसांतर्फे १०९० हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.