पुणे : आषाढवारीसाठी जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा देहुगावातून 27 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी संस्थानच्या वतीने सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. 


सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा ज्येष्ठ कृष्ण सप्तमी ही देहुतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असते. पालखीचा पहिला मुक्काम देहुगाव येथील इनामदारवाड्यात असतो. पालखी बुधवारी 29 ला पुण्यात मुक्कामी असणार आहे. पालखी 15 जुलैला पंढरपूरला पोहाचणार असून 19 जुलैला पालखीचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे.