शरद पवारांचे नातू रोहित पवार यांचा विजय
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू रोहित राजेंद्र पवार यांना यश मिळालंय.
पुणे : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू रोहित राजेंद्र पवार यांना यश मिळालंय.
रोहित शिर्सुफळ - गुणवडी गटातून विक्रमी मतांनी विजयी झालेत.या निवडणुकीच्या माध्यमातून शरद पवार यांच्या चौथ्या पिढीने राजकारणात प्रवेश केलाय.
रोहित पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांचे रोहित पुत्र आहेत. रोहित पवार यांच्या निवडणुकीतील विजयामुळे राज्याला आणखी एका नव्या काका पुतण्यांचं राजकारण पहायला मिळणार आहे.