ठाणे : महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. ठाण्यातील शिवाईनगर परिसरातील अपक्ष उमेदवार सुधाकर चव्हाण यांचे समर्थक गणेश टाक यांनी अचानक शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, गोडीगुलाबीने मला नेऊन सेना प्रवेशाचे कुभांड रचल्याची कबुली गणेश टाक यांनी दिली. जबरदस्तीचा सेनाप्रवेश सेनेच्या अंगाशी आल्याची टीका सुधाकर चव्हाण यांनी केली. यानंतर सुधाकर चव्हाण यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी गर्दी केली. 


त्यातच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.