पिंपरी : 6 वर्षीय चिमुकलीवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत घडली. चौघांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चिमुकली खेळत असताना, दोघांनी तिला निर्जनस्थळी नेले आणि त्याठिकाणी या चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घडला प्रकार चिमुकलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.