पुणे : मेरीट लिस्टमध्ये नाव येऊनही पुण्यातील एम ए रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची आज अखेरची तारीख होती. तरीही महाविद्यालयाने प्रवेश द्यायला अजून सुरूवातच केलेली नाही. त्यामुळे लिस्टमध्ये नाव येऊनही प्रवेश न मिळत नसल्याने विद्यार्थ्यात संताप दिसून येत आहे. 


उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 85 टक्के जागांवर राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणं बंधनकारक आहे. मात्र रंगूनवाला कॉलेज या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना जाणूनबुजून अडवलं जात असल्याचं विद्यार्थ्त्यांचं म्हणणं आहे. 


19 तारखेला खासगी महाविद्यालयांच्या प्रवेशाची पहिली यादी जाहिर झाली. त्यानुसार मेरिटलिस्टमध्ये नाव आलेले 80 हून अधिक विद्यार्थी अजुनही अँडमिशनच्या प्रतिक्षेत आहेत. गुरुवारी अँडमिशन घेण्याची शेवटची तारीख असल्याने विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालया मध्ये गर्दी केली होती. मात्र वारंवार विचारणा करुनही कॉलेज प्रशासनाकडून प्रवेशाबाबत कोणतंही ठोस उत्तर मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.