देहू : पाणी तापविण्यासाठी बाथरूममध्ये ठेवलेल्या हिटरचा शॉक लागून एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झाला. देहूरोड येथे ही दुर्दैवी घटना घडलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेल्वन वेलापांड़ी, त्याची पत्नी भारती आणि त्यांचा दहा वर्षांचा मुलगा ससविन अशी मृतांची नावं आहेत. आंघोळीचं पाणी काढण्यासाठी भारती यांनी हिटर सुरु केला त्यावेळी त्यांना वीजेचा जोरदार झटका बसला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा दहा वर्षांचा मुलगाही होता. त्यानं आईला हात लावल्यानं त्यालाही वीजेचा झटका बसला. 


भारती आणि मुलाला वाचवण्यासाठी सेल्वन गेले असता त्यांनाही शॉक लागला. त्यानंतर या सर्वांना तातडीनं उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषीत केलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये.