महानगरपालिकांसाठी सरासरी 56 टक्के मतदान
राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज 56.30 टक्के मतदान झालंय. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी ही माहिती दिलीय.
मुंबई : राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज 56.30 टक्के मतदान झालंय. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी ही माहिती दिलीय.
प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे...
बृहन्मुंबई - 55 टक्के
ठाणे - 58 टक्के
उल्हासनगर - 45 टक्के
पुणे - 54 टक्के
पिंपरी-चिंचवड - 67 टक्के
सोलापूर - 60 टक्के
नाशिक - 60 टक्के
अकोला - 56 टक्के
अमरावती - 55 टक्के
नागपूर - 53 टक्के
2012 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सरासरी 52 टक्के मतदान झालं होतं. यंदा मतदानाच्या टक्क्यांत वाढ दिसली असली तरी अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळ प्रकर्षानं समोर आला.