रत्नागिरी : कोकणची ओळख असलेल्या पारंपारिक शिमगोत्सवाला उद्यापासून कोकणातील गावागावात सुरूवात होणार आहे. फाक पंचमीच्या आदल्या दिवशी कोकणात शिमग्याला सुरूवात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज गावागावातील ग्रामस्थ जंगलात जाऊन होळीसाठी झा़ड निश्चित करतात. काही ठिकाणी शेवरीचे तर काही ठिकाणी आंब्याचे झाड होळीसाठी आणले जाते. जंगलात गेलेली मंडळी निश्चित झाडाचे पूजन करतात नंतर हे झाड पारंपारिक वाद्य असलेल्या ढोल ताशांच्या तालात गावात आणले जाते. 


आपली ग्रामदेवता आणि एकमेकांच्या नावाचे शिमग्याचा फाका घालत कोकणी माणूस आपला शिमगोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज होतो. गावात वर्षानुवर्ष निश्चित केलेल्या जागेवर हे झाड उभारून फाक पंचमीच्या दिवशी होळीचा पहिला होम पेटवला जातो. आजपासून पुढील पंधरा दिवस कोकणातील गावागावात शिमगोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळेल.