नाशिक : व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पसरवून अफवा पसरवणाऱ्या सात जणांवर नाशिकमध्ये सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन गटांतील तणावामुळे ग्रामीण भागातील आठ गावात लागू करण्यात आलेली इंटरनेट बंदी उद्यापर्यंत परिस्थिती पाहून उठवली जाणार आहे. 


पहिल्याच दोन दिवसांत ग्रामीण भागातील पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेऊन पाच पोलीस कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. 


नागरिकांना अफवांवर विश्वास ठेऊ नये, शांतता प्रस्थापित करून पोलिसांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस महानिरिक्षकांनी केले आहे.