ठाणे : आपल्या व्यस्त आयुष्यात निरोगी आरोग्यासाठी महिलांनी काही क्षण काढावेत हा संदेश देण्यासाठी ठाण्यात एका खास सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नऊवारी साज करत सायकलवर स्वार होत या महिलांनी निरोगी आरोग्यासाठी संदेश दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिलांना स्वता:च्या तब्येतेची काळजी घ्यायला अजिबात वेळ नाही. त्यामुले कँसर, हृद्यरोग यासारखे आजार महिलांमध्ये वाढले आहेत. या सर्वांवर महिलांनीच मात करायला हवी असा देण्यासाठी आणि महिलांना प्रोत्साहान देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


या रॅलीला प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेते मिलिंद सोमण यांनी खास उपस्थिती होती. वाढत्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी योगा आणि चालण्यासाठी प्रत्येक महिलेने वेळ काढाव असं आवाहन सोमण यांनी केलं.