वसई : वसईच्या रेल्वे स्टेशनवर चुकीच्या पद्धतीनं चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नातला एक तरूण कसा जखमी झाला याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसई स्टेशनवर संध्याकाळी सातच्या दरम्यान एक तरुण चालत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या प्रयत्नात तो प्लॅटफॉर्मवर पडला आणि जखमी झाला. 


सुजित यादव असं या २८ वर्षीय तरुणांच नाव आहे. सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार स्पष्ट झालाय.