मुंबई : महापालिकेत शिवसेनेचा महापौर विना अथडळा विराजमान झाला. महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर विराजमान झाल्यात. मात्र, महापालिकेच्या सभागृहात घोषणाबाजीची जुगलबंदी पाहायला मिळाली. त्यामुळे सभागृहातील वातावरण थोडे गरम झालेले दिसून आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापौर निवडीच्यावेळी भाजप नगरसेवकांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा दिल्या तर शिवसेना नगरसेवकांनी ‘बाळासाहेब… बाळासाहेब’ अशा घोषणा देत भाजपला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सभागृहात शिवसेना-भाजपमध्ये घोषणायुद्ध दिसून आले.



शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांच्या महापौर निवडीनंतर भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी त्यांच्या गळ्यात कमळाच्या फुलांचा हार घातला आणि त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांचे आभार मानले. त्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह हुतात्मा चौकात दाखल झाले आणि हुताम्यांना अभिवादन केले.