मुंबई :  सायन प्रतीक्षानगरमध्ये प्रभाग क्रमांक 173 मधून शिवसेननं प्रल्हाद ठोंबरेंना उमेदवारी दिलीय.  त्यामुळे नाराज उपशाखाप्रमुख सुनिल शेट्टे यांनी बंडखोरी केलीय. 


शेट्टेंनी आज अपक्ष म्हणून अर्ज भरलाय. पक्षांनं विचार केला नाही, त्यामुळे आता पर्याय नसल्याचं शेट्टेंनी म्हटलंय. दरम्यान काही शिवसेना उमेदवारांनी शक्तीप्रदर्शऩ करण्यासाठी ढोलताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज भरले.