यादी जाहीर न करताच भाजपनं दिले AB फॉर्म
कधी नव्हे ते पालिका निवडणुकीत अनुकूल वातावरण आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्यानेच मुंबई भाजपाने परस्पर उमेदवारांना AB फॉर्म द्यायला सुरुवात केली आहे.
मुंबई : कधी नव्हे ते पालिका निवडणुकीत अनुकूल वातावरण आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्यानेच मुंबई भाजपाने परस्पर उमेदवारांना AB फॉर्म द्यायला सुरुवात केली आहे. जिथे वाद नाहीत अशा वॉर्डचेही उमेदवार भाजपाने जाहीर केलेले नाहीत हे विशेष.
नाराज आणि बंडखोरांना रोखण्यासाठी भाजपाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे भाजपाने अजून यादी जाहीर केलेली नाही. एवढेच नव्हे तर रासप, आरपीआय यांच्याबरोबरही जागा वाटप प्रकरण पद्धतशीरपणे लांबवत ठेवले आहे. काही ठिकाणी इतर पक्षांचे उमेदवार बघून भाजप शेवटच्या क्षणी उमेदवार देणार आहे. काही दिवसांपूर्वी आक्रमक असलेले भाजप आता उमेदवार अर्ज भरण्याच्या वेळी काहीसे बॅकफूट वर गेलेले आहे.