भाजपा कधीच सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - फडणवीस
भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेत केवळ सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय.
मुंबई : भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेत केवळ सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर भाजपकडून राज्यभर जल्लोष करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
राज्याचं प्रदेश कार्यालय मुंबईतल्या नरिमन पॉईंट इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि विविध मंत्र्यांची उपस्थिती होती.