मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आज एकाच दिवसात, न्यायालयाकडून दोन दणके मिळाले आहेत. छगन भुजबळ यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये करण्याचे आदेश, विशेष इडी न्यायालयाने संध्याकाळी सुनावणी दरम्यान दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुजबळांची एन्जीओग्राफी करायची की नाही हे त्यांच्या कुटुंबियांना बोलावून ठरवा. त्यानुसार आवश्यकता भासल्यास पुढे भुजबळांना हॉस्पिटलमध्ये नेऊ शकता, असंही विशेष ईडी न्यायालयानं सांगितलंय. त्याआधी सकाळी भुजबळांना मुंबई उच्च न्यायालयानंही जबरदस्त दणका दिला. आपल्याला ईडीनं चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे. असा दावा करणारी याचिका छगन भुजबळ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. 


त्यामुळे ईडी कस्टडीतून बाहेर पडण्याची छगन भुजबळांची धडपड दुस-यांदा अयशस्वी ठरली. याआधी तब्येतीच्या आधारावर छगन भुजबळ यांनी जामिन अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने विशेष डॉक्टरांचं पथक स्थापन केलं होतं. भुजबळ ठणठणीत असल्याचा अहवाल डॉक्टांच्या या विशेष पथकानं दिल्यानंतर उच्च न्यायालयानं भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळला होता.