मुंबई : कोणत्याही पालकांना आजकाल वाटतं की आपली मुलं क्रिएटीव्ह असावीत, त्यांच्यातली कलात्मकता आणि सृजनशीलता सतत वाढावी, मात्र आपली मुलं तासंनतास टीव्हीवर त्यांचा आवडता कार्टुन शो पाहतायत, असं असलं तर  ते धोकादायक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण नव्या सर्वेनुसार तुमची मुलं १५-१५ मिनिटं जर टीव्ही पाहत असतील तर त्यांची क्रिएटीव्हिटी शून्य होते.


ब्रिटनच्या स्टेफोर्डशायर विद्यापीठाचे प्रवक्ते सरोह रोज यांनी म्हटलं आहे की, याचे स्पष्ट पुरावे मिळाले आहेत की, टेलिव्हिजन पाहिल्यानंतर मुलं मूळ विचारांच्या सोबत येतात, मात्र त्यांनी हे देखील सांगितलं की, हा प्रभाव हळूहळू कमी होण्यास सुरूवात होत आहे.


मुलं जर आपल्या खेळात कमी रचनामत्मक असतील तर पुढे जाऊन त्यांच्यावर नकारात्मक फरक पडतो, असंही सरोह यांनी म्हटलं आहे. ‘पोस्टमॅन पॅट’ मालिका पाहणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा इतर मुलांनी अभ्यासात, आणि कोडे सोडवण्यात चुणूक दाखवली आहे.


हा सर्वे टेलीव्हिजन शो बनवणारे, लहान मुलांना शिकवणारे आणि आई-वडिलांना उपयोगाचा ठरू शकतो.