मुंबई : राज्यभरातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टरांनी आज सामूहीक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी रुग्णालयातल्या सेवा जवळपास बंद आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. रुग्णालाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी रात्री मुंबईतल्या सायन मध्ये असणाऱ्या लोकमान्य टिळक रुग्णालयात मृत्यू पावलेल्या एका महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली. त्यानंतर काल रात्री औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात क्षुल्लक कारणावरून दोन डॉक्टरांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांनी काम बंद केलंय.  



त्याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरूवात झालीय. आज सकाळी पुण्यातल्या ससून रुग्णालयातले निवासी डॉक्टर संपावर गेलेत. तर सांगलीतही वैद्यकीय महाविद्यालयात 70 डॉक्टरांनी काम करण्यास नकार दिलाय...नागपूरच्या महाविद्यालयातले 350 डॉक्टर्सही संपावर आहेत. सुरक्षेत वाढ व्हावी, या प्रमुख मागणासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान अत्यावश्यक सेवा मात्र सुरु ठेवण्यात आल्य़ा आहेत.



दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, डॉक्टरांना सुरक्षा रक्षकांची वाढविण्यात येणार आहे. डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन झी २४ तासशी बोलताना केले.