मुंबई : ईस्टर्न-एक्प्रेस हायवेवर सोलर बायो टॉयलेट सुरु करण्यात आलंय. इतकच नाही तर महिलांसाठी शहराजवळील हायवेवर आणि सार्वजनिक ठिकाणी हायटेक रेस्टरूमही बनवण्यात येणार आहेत. या प्रसाधनगृहांचा प्रायोगीत तत्वावर वापर सुरु करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वच्छ भारत अभियानात ठाणे शहरानं एक अनोखं पाऊल उचललंय.  ठाणे शहरातील तीन हात नाका परिसरात अगस्ती, हिरानंदानी फाऊंडेशन आणि ठाणे महानगर पालिकेनं महिलांसाठी हायटेक बायो टॉयलेट उभारलंय. हे नवं बायोटॉयलेट दुर्गंधीयुक्त प्रसाधनगृहांना उत्तम पर्याय ठरणार आहेत..


ही बायो टॉयलेट्स किफायतशीर आणि इको फ्रेंडली आहेतच शिवाय यांना सीवेज ट्रीटमेंटची आवश्यकता नाही.. कंटेनरच्या स्वरुपातली ही बायो टॉयलेट्स कमी जागेत उभारणंही सहज शक्य आहे.. यात पाण्याचा वापरही अत्यंक कमी होतो.. छतावर सोलार पॅनल लावल्याने इथला वीजेचा प्रश्नही मिटलाय. यात मोफत स्वरुपाचं कम्युनिटी टॉयलेट आणि महिलांसाठी विशेष टॉयलेट तयार करण्यात आलंय ज्याच्या वापरासाठी महिलांना पाच रुपये शुल्क भरावं लगणार आहे.


महिलांच्या बायो टॉयलेटमध्ये महिलांसाठी रेस्ट रुम, लहान मुलांसाठी स्वतंत्र रुम, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीनची सुविधा, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही अशा सुविधा असणार आहेत.


वर्दळीचे रस्ते, महामार्गाच्या ठिकाणी शौचालयं नाहीत. अशा ठिकाणी ही बायो टॉयलेट उभारली जाणार आहेत. ठाणे माहापालिकेनं प्रायोगीत तत्वावर याचा वापरही सुरु केलाय आणि ही प्रसाधनगृहे लोकांच्याही पसंतीत उतरलीत.


स्वच्छ भारत अभियानात ठाणे शहरानं एक पाऊल पुढे टाकलंय. आता इतर शहरांनीही ठाणे शहराचं अनुकरण करण्यास काहीच हरकत नाही.