वर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक
वर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ हे भारतीयांच्या शरीरात हळूहळू विष पेरण्याचं काम करत असल्याचं एफएसएसआय अर्थातच द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडियानं म्हटलंय.
मुंबई : वर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ हे भारतीयांच्या शरीरात हळूहळू विष पेरण्याचं काम करत असल्याचं एफएसएसआय अर्थातच द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडियानं म्हटलंय.
प्रामुख्यानं रस्त्यावर जे पदार्थ मिळतात ते वर्तमानपत्रात पॅक करुन दिले जातात. यामुळे कॅन्सरही होऊ शकतो असं या संस्थेनं म्हटलंय. त्यामुळे पदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर टाळण्याची सूचना करण्यात येणार आहे.
वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी जी शाई वापरली जाते ती हानिकारक असते आणि त्यामुळे पदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्र टाळाण्याचं आवाहन केलं जातंय.