मुंबई : यूजीसीनं एमफील आणि पीएचडी करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा दिलाय. यापुढे एमफील आणि पीएचडीसाठी प्रवेश घेतलेल्या महिलांना २४० दिवसांची मॅटर्निटी लिव्ह  मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमफील आणि पीएचडी करणाऱ्या बहुतांश महिला आपलं संशोधन बऱ्याचदा गरोदरपणामुळे सोडून द्यावं लागतं. त्यामुळे त्यांनी तोपर्यंत केलेलं काम वाया जातं. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन संशोधनपूर्ण करण्यासाठी महिलांना दोन वर्षांचा अतिरिक्त अवधी आणि २४० दिवसांची मॅटर्निटीची लिव्ह देण्यात येणार आहे. 


याशिवाय पीएचडी किंवा एमफील करताना महिलेला आपलं शहर काही कारणास्तव सोडावं लागलं. तरी संशोधनासाठी तिनं जमा केलेला डेटाही दुसऱ्या विद्यापीठात कॅरी करता येणार आहे.