मुंबई : बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदाही उशीरा लागण्याची शक्यता आहे. कारण मागण्या मान्य न झाल्यामुळं शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परीक्षक दररोज केवळ एकच पेपर तपाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेनं दिलाय. त्यामुळं बारावीची परीक्षा पुन्हा चर्चेत आलीय.


 येत्या ८ दिवसात शासनानं संघटनेबरोबर चर्चा करून मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास १२ वी परीक्षेचे पेपर तपासण्याबाबर असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. 
 
 परीक्षा मात्र सुरळीत पार पाडणार असल्याचंही संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलंय.  आमच्या मागण्यांबाबत शासनानं तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात  येईल असा इशाराही संघटनेनं दिलाय.