मुंबई :  कॉमेडियन कपिल शर्माने मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत ट्विट केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली आणि सूत्रे हलली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका ट्विटवरुन दखल घेतल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केलीये. 


कपिल शर्मा नशीबवान आहेत, त्यांच्या ट्विटला मुख्यमंत्र्याचे किमान उत्तर तरी आले, आम्ही मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट्राचाराचे सभागृहात आणि सभागृहाबाहेर अनेक वेळा पुरावे देऊनही कारवाई तर सोडा साधे उत्तर ही येत नाही, असे मुंडे म्हणाले. 


मुंबई महानगरपालिकेतील मागील 10 वर्षाच्या कारभाराचे CAG मार्फत विशेष लेखापरीक्षण झाले पाहिजे, नंतरच खरा भ्रष्ट्राचार बाहेर येईल. अनेक वेळा मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटलेय.