सामान्यांसाठी म्हाडाची लॉटरी निघणार
गिरणी कामगारांपाठोपाठ सामान्यांसाठीही म्हाडाच्या घरांची जाहिरात काढण्यात येणार आहे. सामान्यांसाठी मुंबई महापालिका परिक्षेत्रात एक हजार 11 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी दिलीय.
मुंबई : गिरणी कामगारांपाठोपाठ सामान्यांसाठीही म्हाडाच्या घरांची जाहिरात काढण्यात येणार आहे. सामान्यांसाठी मुंबई महापालिका परिक्षेत्रात एक हजार 11 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी दिलीय.
पवई, बोरिवली, मानखुर्द, मागाठाणे आणि गोरेगावमध्ये ही घरं असणार आहेत. तर मुंबईतल्या गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या घरांची जाहिरात याच आठवड्यात काढण्याची शक्यता आहे. 21 किंवा 22 एप्रिलला ही जाहिरात निघण्याची शक्यता आहे.
दोन हजार 87 घरांसाठी ही जाहिरात काढण्यात येणार आहे. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा जाहिरात निघाल्यानंतर लवकरच लॉटरी काढण्यात येणार असल्याचंही म्हाडातर्फे सांगण्यात आलंय.