मुंबई : इंदौरमधला कुख्यात गुंडाबरोबर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे संबंध असल्याचा गंभीर आरोप, काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज काझी हा इंदौरमधला कुख्यात गुंड आहे. त्याच्याविरोधात खुनाचे गुन्हेही सिद्ध झाले आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राम शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्री असताना त्यांनी कशी काय भेट घेतली?


तसेच गुंड युवराज काझीने राम शिंदे यांच्यासोबत फोटो काढल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. राम शिंदे इंदौरला जाऊन युवराज काझीला भेटल्याचा आरोपही नितेश राणेंनी केला.