मुंबईत अल्पवयीन मुलीची हत्या
मुंबईतील वाकोला परिसरात रविवारी १६ वर्षीय सोफिया शेख या अल्पवयीन मुलीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईतील वाकोला परिसरात रविवारी १६ वर्षीय सोफिया शेख या अल्पवयीन मुलीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.
एकतर्फी प्रेमातून तरूणानं ही हत्या केल्याचं समजतयं. हा आरोपी हत्या करून पळून जात असतानाच ट्रॅफिक पोलिसांनी त्याला पकडलं. दरम्यान, आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपी तिच्या घराच्या शेजारीच रहात असल्याचं समजतयं.
गेल्या १० महिन्यांपासून तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. रविवारी त्याने तिला भेटण्यासाठी बोलवलं असता, त्यांच्यात भांडण झालं आणि या भांडणानंतर अखेर आरोपीनं मुलीची गळा चिरून हत्या केली.