COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील फ्लॅशमॉब सर्वांनाच माहित आहे, यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी फ्लॅशमॉब घेण्यात आले, पण या फ्लॅशमॉबची सर कुणालाही आली नाही. 


हा मुंबईतील सर्वात पहिला फ्लॅशमॉब होता, आणि हा सर्वात लोकप्रिय ठरला. चाकरमान्यांना रोजच्या धकाधकीतून काही वेळा जरा रिलॅक्स वाटावं म्हणून हा फ्लॅशमॉब घेण्यात आला होता.


या फ्लॅशमॉबला ५ वर्ष झाली असली, तरी तसा फ्लॅशमॉब अजून घेतला गेलेला नाही, रेल्वेच्या उद्घोषणेच्या जागी गाणी सुरू झाल्यानंतर गर्दीतून येऊन काही तरूणांनी डान्सला सुरूवात केली, आणि हा प्रकार मुंबईत लोकप्रिय होण्यास सुरूवात झाली.