अजित मांढरे, मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि थर्टी फर्स्टच्या पार्ट्या लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मुंबईत महिलांसाठी चोख बंदोबस्त ठेवलाय. त्यासाठी थोडेथिडके नव्हे तर तब्बल सात हजार पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करणाऱ्या मुंबईकरांसाठी आणि खास करुन महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा फायदा घेत महिलांची छेडछाड करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी धडक योजना आखलीय. स्वत: मुंबई पोलीस थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथक निर्माण केलेत, अशी माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिलीय.  


महिलांच्या सुरक्षेसाठी यंदा मुंबईत जवळपास ७ हजार अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. यात


- ३ हजार ५५० पोलीस


- ५५० महिला पोलीस 


- २० महिला पोलीस निरीक्षक


- ७० सहाय्याक पोलीस उपनिरीक्षक 


- ७० पोलीस निरीक्षक


- १२० सहाय्यक पोलीस निरीक्षक


- २ सहाय्यक पोलीस आयुक्त


यांचा समावेश असेल. शिवाय लोकल पोलीस बंदोबस्तासाठी असणारच आहेत. बंदोबस्तासाठी सर्व पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. ही झाली महिलांची सुरक्षा. या व्यतिरिक्त नववर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलीय. यासाठी स्वत: मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसालगीकर संपू्र्ण रात्र जागता पहारा देणार आहेत.


- ५ सह पोलीस आयुक्त 


- ९ अप्पर पोलीस आयुक्त 


- ३५ डीजीपी 


- ७४ एसीपी


हे मुंबई पोलीस दलातील मोठे अधिकारी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या रात्री सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील गल्ली बोळात फिरणार आहेत. शिवाय


- ४५ हजार पोलीस


- १०० महिला छेडछाड पथक


- हरवलेल्या मुलांच्या शोधाकरता विशेष पथक


- २ राज्य राखीव दल


- ५०० होमगार्ड


- ५५०० स्वयंमसेवी संस्थांचे स्वयंमसेवक


- ५ ड्रोन


- शीघ्र कृती दल


असा पोलिसांचा ताफा यंदा थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन बंदोबस्तासाठी रात्रभर मुंबईतल्या रस्त्यांवर तैनात असणार आहे.