मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरची टोल दरवाढ बेकायदेशीर?
आता मुंबई - पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक वाईट बातमी... येत्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे १ एप्रिल २०१७ पासून मुंबई - पुणे महामार्गावरील टोलमध्ये मोठी वाढ होणार आहे. जुन्या महामार्गासह एक्सप्रेस हायवेवरील टोलमध्ये १८ टक्क्यांची वाढ होणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्यांवरील टोलमधून अपेक्षित उत्पन्नाची भरपाई झालेली असताना ही टोलवाढ लागू होणार आहे.
मुंबई : आता मुंबई - पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक वाईट बातमी... येत्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे १ एप्रिल २०१७ पासून मुंबई - पुणे महामार्गावरील टोलमध्ये मोठी वाढ होणार आहे. जुन्या महामार्गासह एक्सप्रेस हायवेवरील टोलमध्ये १८ टक्क्यांची वाढ होणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्यांवरील टोलमधून अपेक्षित उत्पन्नाची भरपाई झालेली असताना ही टोलवाढ लागू होणार आहे.
असे असतील नवे दर...
कार - १९५ वरून २३० रुपये
लाईट मोटर व्हेईकल - ३०० वरून ३५५ रुपये
ट्रक - ४१८ वरून ४९३ रुपये
बस - ५७२ वरून ६७५ रुपये
थ्री एक्सेल व्हेईकल - ९९० वरून ११६८ रुपये
मल्टी एक्सेल व्हेईकल - १३१७ रुपयांवरून १५५५ रुपये
येत्या १ एप्रिलपासून एक्सप्रेस हायवेरील टोल दर वाढीचा हा झटका प्रवाशांना बसणार आहे. जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरील देखील टोल दर वाढणार आहेत. जुन्या महामार्गावर कारसाठी सध्या १०१ रुपये आकारले जातात. त्यात १ एप्रिलपासून १६ रुपयांची वाढ होणार आहे. इतर वाहनांसाठीच्या टोलमध्ये देखील वाढ होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दिलीय.
कंत्राटाची वसुली पूर्ण पण...
एक्सप्रेस हायवेवरील टोलवसूलीतून कंत्राटदार कंपनीला २८६९ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्याची पूर्तता नोव्हेंबर २०१६ लाच झाल्याचा सामाजिक संस्थांचा दावा आहे. तीच परिस्थिती जुन्या महामार्गाबाबतही आहे. मात्र कराराची मुदत संपली नसल्याच्या कारणाखाली ही अतिरिक्त टोल वसुली सुरु आहे.
महाराष्ट्रातील टोल हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. निवडणूकीपूर्वी सरकारकडून टोलमुक्तीचं आश्वासन मिळालं होतं. मात्र काही किरकोळ ठिकाणचे टोल नाके बंद करण्यात आले. मुंबई - पुणे महामार्गावरील टोळ धाड मात्र सुरुच आहे.