युती-आघाडी आनंदाने नाही तर गरजेपोटी होते - गडकरी
महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं नितीन गडकरी यांची आज विलेपार्ले इथं जाहीर सभा पार पडली. यावेळी, त्यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली... सोबतच, `सेनेच्या नेतृत्वाला आव्हान आहे, माझे आवाहन आहे की महाराजांची शपध घेऊन सांगा मी पालिकेत भ्रष्टाचार केला नाही... हे शपथ घ्याची हिंमतच करणार नाहीत` असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं नितीन गडकरी यांची आज विलेपार्ले इथं जाहीर सभा पार पडली. यावेळी, त्यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली... सोबतच, 'सेनेच्या नेतृत्वाला आव्हान आहे, माझे आवाहन आहे की महाराजांची शपध घेऊन सांगा मी पालिकेत भ्रष्टाचार केला नाही... हे शपथ घ्याची हिंमतच करणार नाहीत' असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले नितीन गडकरी
- मुंबईचा विकास करण्याकरता जे व्हिजन समोर ठेवायला पाहिजे ते मात्र ठेवले गेले नाही
- 55 उड्डाणपूलांचा खर्च 1600 कोटी रुपये अपेक्षित होता, मात्र हा खर्च 1000 कोटींवर गेला
- मुंबई - पुणे एक्सप्रेस हाय वे 3600 ऐवजी 1650 कोटी रुपये खर्चमध्ये पूर्ण केला
- वरळी सी लिंकचा खर्च 420 कोटींहून 1600 कोटीपर्यंत नेली. आयुष्यभर टोल भरावा लागणार आहे
- वैतरणा धरणाचा एस्टीमेटेड खर्च 1300 कोटींनी वाढला, हे कसे झालं?
- 20 वर्षात सेनेने असे काय केले ते मुंबईकरांना आपलेसं वाटेल
- सॉलिड आणि लिक्विड कचऱ्याबद्दल मी उद्धव यांना सांगितले, यावर काही केले पाहिजे... मात्र, मुंबईत काहीही झाले नाही? का?
- आम्ही नागपूरमध्ये विकासाचहा अजेंडा राबवला, कचऱ्यामधून पैसे मिळवले... मुंबईत हे झाले नाही
- महापौर - स्थायी समिती हे शिवसेनेकडे होते का केले नाही
- उद्धव म्हणाले नागपूरमध्ये पाणीटंचाई आहे, मात्र नागपूरमध्ये सध्या 24 तास पाणी मिळतंय
- दुष्काळ असताना नागपूरमध्ये एकही मोर्चा निघाला नाही, पाणी प्रश्न सुटला हे मुंबईत का नाही झाले...
- आज राज्यात 3 लाख कोटी रूपयांचे सिमेंट काँक्रीटच्या रोडला परवानगी दिली
- मी सिमेंटचे रस्तेबाबत असा निर्णय घेतल्यावर काही नगरसेवक, लोकप्रतीनिधी, पक्षप्रमुख नाराज होतात
- भ्रष्टचार मुक्त कारभार हा पालिका निवडणूकचा अजेंडा आहे. शिवसेनेने काय केले 20 वर्षात
- मात्र मुंबईचा महापौर अडीच वर्षात जलवाहतूकसाठी, प्रकल्पासाठी पैसे द्या अशासाठी कधी भेटला नाही
- रेलवे लाईनवर ब्रिज बांधावा यासाठी आम्ही तयार असून सुद्धा कधी पालिकेचा प्रस्ताव आला नाही
- उद्धव म्हणतात आम्ही प्रादेशिक पक्षांशी आघाडी करू... अहो तुम्हाला कोण घ्यायला तयार नाही
- मला वाईट वाटले, उद्धव म्हणाले की 25 वर्षे आम्ही सडली
- धीही युती - आघाडी आनंदाने होत नाही, गरजेचे पोटी होते... जर युती झाली नसती तर मुख्यमंत्री सेनेचा झाला नसता
- मरीन ड्राईव्ह पेक्षा तीन पट चांगला रस्ता बीपीटीला बांधीन... बीपीटी मुंबईचा महत्त्वाचा भाग राहील.. एकही फूट जमीन बिल्डरला देणार नाही... जगाला अभिमान वाटेल अशी सुधारणा करणार...
- मुंबईच्या मोठ्या समुद्राचा वापर कधीच केला नाही... पाण्यावर चालणारी बस मुंबईत आली आहे... आचारसंहितेपोटी थांबलीय...
- सेनेचं नेतृत्व टक्केवारीवर आलं आहे, मात्र व्हिजनंच नाही, मुंबईचा विकास अडला आहे
- सेनेच्या नेतृत्वाला आव्हान आहे, माझे आवाहन आहे की महाराजांची शपध घेऊन सांगा मी पालिकेत भ्रष्टाचार केला नाही... हे शपथ घ्याची हिंमतच करणार नाहीत
- एकहाती सत्ता द्या भाजपाला, जे 50 वर्षात झाले नाही ते 5 वर्षात काम करू, मुंबईचे भविष्य बदलू