दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी भाड्याचे सूत्र ठरवण्यासाठी जनतेकडून मते मागवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार ऑटोरिक्षा, टॅक्सी व्यावसायकांना, त्यांच्या संघटनांना तसेच जनतेला भाड्याबाबत आपले मत ऑनलाईन नोंदवता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

www.transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन जनता आपला अभिप्राय़ देऊ शकते. ऑटो-टॅक्सी भाडे सूत्र ठरवण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने राज्यातील विविध ठिकाणी जाऊन बैठका घेतल्या. 


ऑटो-टॅक्सी संघटना आणि ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींची मते आजमावली. मात्र विविध मुद्यांवर संबंधितांमध्ये मतभिन्नता दिसून आली आहे. त्यामुळे आता थेट जनतेकडूनच भाड्याबाबत अभिप्राय मागवण्याचे परिवहन विभागाने ठरवले आहे.