मुंबई : 'तुमच्या राजाला साथ द्या' म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईकरांना साद घातली खरी... पण, मनसेच्या आत्तापर्यंतच्या विविध धोरणांमुळे थोडा घोळच झाला... मुंबईकरांनी 'राजा'च्या हाकेला साद देत 'साथ' दिली ती केवळ 'सात' जागांवर...


मुंबईत सर्वात जास्त म्हणजेच 84 जागा शिवसेनेला मिळाल्यात. त्यापाठोपाठ भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादीला 10, मनसेला 7 आणि इतर 14 जागांवर निवडून आलेत. 
  
21 तारखेला झालेल्या महापालिका मतदानानंतर विविध सर्व्हे जाहीर करण्यात आले होते... यामध्ये, 'आज तक'च्या सर्व्हेत मनसेला 5 ते 7 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, हा अंदाज खरा ठरल्याचं म्हटलं जातंय.