मुंबई : भाजपचे खासदार उदित राज यांनी धावपटू उसेन बोल्टच्या बीफ खाण्यावरुन केलेल्या विधानावर सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मजेशीर उत्तर दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकार परिषदेत आठवले यांना उदित राज यांच्या विधानासंबंधित विचारण्यात आले त्यावेळी आठवले म्हणाले, उदित राज माझे मित्र आहेत.


त्यानंतर काही वेळ थांबून त्यांनी त्या खेळाडूचे नाव मराठीत विचारले आणि म्हणाले तो एक महान खेळाडू असून त्याने अनेक पुरस्कार जिंकलेत. खाण्यापिण्याच्या सवयीशी महान होण्याचा काहीही संबंध नाही. केवळ बीफ खाल्ल्याने सन्मान मिळत नाही. मी बीफ खात नसलो तरी मी मंत्री झालो, अशा शब्दात त्यांनी यावेळी उत्तर दिले. 


उदित राज यांनी ट्विटरवर उसेन बोल्ट बीफ खात असल्याने त्याने ऑलिम्पिकमध्ये 9 सुवर्णपदके जिंकली असे म्हटले होते. त्यांच्या या ट्विटनंतर उदित राज यांच्यावर  जोरदार टीका झाली होती.