मुंबई : रिक्षा, टॅक्सीवाल्यांची नेहमीच मुजोरी समोर येते. अनेक ठिकाणी भाडे नाकारले जाते. यावरून अनेक वेळा वादही होतात. घाटकोपरच्या डोंगराळ झोपडपट्टी विभागात रस्ते चांगले असूनही तिकडे रिक्षाचालक जात नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर उपाय म्हणून लोकसेवा सहकारी सेवा संस्थेच्या वतीने घाटकोपर स्टेशन ते भीमनगर, कातोंडी पाडा या डोंगराळ भागातून मोफत टॅक्सी सेवा सुरू करण्यात आलीय. यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच विद्यार्थ्यांची मोफत ने-आण करणार आहे. 


सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 अशी आठ तास हि सेवा असणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर दोन व्हॅन तयार केल्या आहेत. या व्हॅनमध्ये प्रवासादरम्यान फोन, फिरतं वायफाय, वर्तमान पत्र, पिण्याचे पाणी या सेवा देण्यात येत आहेत. या उपक्रमाचं विभागातील नागरिकांनी कौतुक केलंय.