मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता आहे. कारण भाजप नेत्यांवरील नाराजी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे व्यक्त करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे युतीच्या आणि जागावाटपाबाबत चर्चा सुरु असताना सोमय्या आणि आशीष शेलार यांच्याकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जातंय. या टीकेला शिवसेनेचे नेते वैतागलेत. ही टीका अशीच सुरु राहणार असेल तर जागावाटपाच्या बैठकीला जाण्यात अर्थ नाही, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे मांडली आहे. 


गुरुवारी एकमेकांच्या जागांच्या याद्या दिल्या जाणार होत्या. मात्र पुन्हा आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. त्यामुळे एका बाजूला बोलणी आणि दुसऱ्या बाजूला बदनामी या दुहेरी भूमिकेमुळे शिवसेनेचे नेते भाजपवर प्रचंड संतापले आहेत. याप्रकरणी आता मुख्यमंत्र्यानी हस्तक्षेप करावा. तसंच बोलणी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यानीच करावीत इथपर्यंत शिवसेनेच्या अंतर्गत तीव्र भावना व्यक्त झाल्या आहेत.