मुंबई : जिल्हा मध्यवर्ती बँकांवर लादण्यात आलेले निर्बंध कायम असतील, अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा जिल्हा मध्यवर्ती बँकांना स्वीकारण्यास निर्बंध घालण्याचा जेटली यांचा निर्णय दुर्दैवी असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले यंत्रणेवर विश्वासच नसेल संपूर्ण व्यवस्थाच मोडीत काढा असा टोलाही त्यांनी जेटली यांना लगावला. 


शेतकऱ्यांना ज्याची आवश्यकता आहे ते कोण देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  शेतकऱ्यांनी आपला पैसा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवलेला आहे. शेतकऱ्यांना त्वरीत पर्याय देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


दरम्यान, जिल्हा बँकांवरील पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची बंदी हटवणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलंय. जिल्हा बँका या काळा पैसा पांढरा करण्याच्या एजन्सीज असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. तर उद्धव ठाकरेंनी सरकारच्या या निर्णय़ावर टीका केलीय.


बंदी उठवायची नसेल तर शेतक-यांना पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय. आरबीआयनं घातलेल्या निर्बंधांमुळं जिल्हा बँकेच्या ग्राहकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. या बंदीचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागाला बसतोय.