मुंबई : महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये काल झालेल्या सिंचन कराराला शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. कृष्णा खोऱ्यातील 81 टीएमसी पाणी महाराष्ट्रानं घेण्यावर आक्षेप घेत तेलंगणानं सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. जोपर्यंत हा आक्षेप मागे घेतला जात नाही, तोपर्यंत गोदावरी पाणीवाटप करार करू नये, अशी भूमिका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेंना घेतली होती.


मुख्यमंत्र्यांनी मात्र करार करतांना त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तेलंगणाचं नाक दाबण्याची संधी गमावल्याची टीका शिवतरेंनी केली आहे. यासंदर्भात 8 मार्चला शिवतारेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. तरीही करार करण्यात आला, याला जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस. चहल जबाबदार असल्याचा आरोप शिववतारे यांनी केला आहे.