ऑलिम्पिक विजेत्यांबाबत शोभा डे पुन्हा बरळल्या
लेखिका शोभा डे यांनी भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त ट्विट करत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलेय.
मुंबई : लेखिका शोभा डे यांनी भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त ट्विट करत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलेय.
ऑलिंपिकमध्ये चमकदार कामगिरी करणारी पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि सिंधूचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांना सचिन तेंडुलकरच्या हस्ते बक्षीस म्हणून बीएमडब्लू कार देण्यात आली.
याबाबतीतही शोभा डे यांनी ट्विट केलेय. बीएमडब्लूची चांगली जाहिरात झाली. मात्र ही बीएमडब्लू या खेळाडूंसाठी पांढरा हत्ती ठरु नये असे त्यांनी ट्विटरवर म्हटलेय.
याआधीही रिओमधील भारताच्या कामगिरीबाबत डे यांनी टीका केली होती. भारतीय खेळाडू केवळ रिओमध्ये सेल्फी काढण्यासाठी गेल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या ट्विटवरुन सोशल मीडियावरुन त्यांच्यावर जोरदार टीका कऱण्यात आली होती.