धक्कादायक, जाकीर नाईकचे डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू जाकीर नाईक आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमनं यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचं आता पुढे आले आहे.
मुंबई : वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू जाकीर नाईक आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमनं यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचं आता पुढे आले आहे.
जाकीर नाईकच्या संस्थेचा मुख्य अर्थिक अधिकारी आमीर गजदरच्या चौकशीत इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला दाऊदनं निधी पुरवल्याचं समोर आले आहे. ईडीने केलेल्या गजदरची तीन दिवस कसून चौकशी केलीय. त्यात IRF हवालाच्या व्यवहारांमध्ये गुंतल्याचंही लक्षात आले.
पाकव्याप्त काश्मीरमधला हवाला ऑपरेटर सुलतान अहमद हा जाकीर नाईक आणि दाऊद यांच्यातला दुवा होता. 2012मध्ये जाकीर नाईक आणि सुलतान अहमद यांची भेट झाली होती, असंही चौकशीत पुढे आले आहे.
दाऊद इब्राहीमचा पैसा साऊदी अरेबिया, ब्रिटन आणि अफ्रिकेतल्या त्याच्या माणसांकरवी झाकीर नाईकच्या संस्थेला मिळत असल्याचाही निष्कर्ष आता ईडीनं काढलाय. इडी सध्या कराचीतल्या काही व्यापा-यांच्या धंद्याची चौकशी करत आहे. चौकशीच्या फे-यात सापडलेले कराचीचे सर्व जण दाऊदचे निकटवर्तीय आहेत.