लवकरच सुरू होणार ओशिवरा रेल्वे स्टेशन
जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकावरील नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी ओशिवरा रेल्वे स्टेशन बांधण्यात आलंय. या स्थानकाचे काम पूर्ण झालंय असलं तरी ते सुरु झालेलं नाही.
मुंबई : जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकावरील नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी ओशिवरा रेल्वे स्टेशन बांधण्यात आलंय. या स्थानकाचे काम पूर्ण झालंय असलं तरी ते सुरु झालेलं नाही.
याच पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या स्थानकाची पाहणी केली. या ठिकाणी आजूबाजूला असणा-या नागरिकांना कोणत्या सुविधा पाहिजे याविषयी काम करणार असल्याचंही देसाई म्हणालेत.
या स्थानकाला ओशिवरा हे नाव न देता, राम मंदिर देण्यात यावं यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली.