मुंबई : महापालिका निवडणुकीत शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी उपस्थित केलेला पारदर्शकतेचा मुद्दा आता भाजपवरच उलटण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत पारदर्शकता हवी, अशी मागणी केली आहे. शासनाच्या कारभारात पारदर्शकता येण्यासाठी लोकायुक्त, विरोधी पक्षनेते, पत्रकार यांनाही बैठकीला उपस्थित राहण्यास परवानागी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. 


तर घटनेला धरून असलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जाणार असल्याची सावध भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. कॅबिनेटच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, दीपक सावंत उपस्थित होते.