जखमी पशुपक्ष्यांचा उपचारच्या नावाखाली फोटो सोशल मीडियावर टाकणे पडणार महागात
जखमी पशुपक्ष्यांना उपचाराच्या नावाखाली घेऊन जाणे, त्यांच्यासोबत छायाचित्र काढून सोशल मीडियावर प्रसिध्द करणे आता स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट यांना महागात पडणार आहे.
मुंबई : जखमी पशुपक्ष्यांना उपचाराच्या नावाखाली घेऊन जाणे, त्यांच्यासोबत छायाचित्र काढून सोशल मीडियावर प्रसिध्द करणे आता स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट यांना महागात पडणार आहे.
मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे अशी कृती करताना कुणी आढळल्यास त्यांना थेट कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. तर जखमी पशुपक्ष्यांसंदर्भात मार्गदर्शक तत्वे आणि स्वयंसेवी संस्थांकरिता नियमावली निश्चित करण्याचे आदेशही कोर्टाने सरकारला दिले आहेत.
विनियोग परिवार ट्रस्ट विरूध्द केंद्र सरकार या प्रकरणात शंकुतला मजुमदार यांनी केलेल्या अर्जावर न्यायमुर्ती सत्यरंजन धर्माधिकार आणि न्यायमुर्ती शालिनी जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. जखमी पक्षी आणि प्राण्यांवर उपचार करताना त्यांचे छायाचित्र घेता येणार नाही.