मुंबई : कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वाराच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या परिवाराने त्यांचे डोळे शासनाच्या अवयवदान मोहिमेत दान केले. शिंदे यांचं पार्थिव संध्याकाळी साडेआठच्या सुमाराला त्यांचं निवासस्थान असलेल्या पोलीस वसाहतीत अत्यंत शोकाकूल वातावऱणात आणण्यात आलं. काल दुपारी एक वाजता शिंदे यांनी लीलावती रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.


विलास शिंदे यांचं पार्थिव घरी आणल्यावर इमारत क्रमांक 28 शेजारीच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होत.. तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचं अत्यंदर्शन घेतलं. त्यानंतर सचिन अहीर, सुनील शिंदे, मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही शिंदे यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनीही सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शिंदे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर शिंदे यांचं पार्थिव सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातल्या शिरगाव या त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलं.