मुंबई : जगातील सर्वात लठ्ठ महिला इमाम अहमद अखेर मुंबईत दाखल झालीय. इजिप्तहून एका खास विमानानं तिला इकडे आणलं. मुंबई विमानतळापासून एका ट्रकमध्ये ऍम्ब्युलन्सच्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. मग तो ट्रक तिथून चर्नीरोडच्या सैफी हॉस्पिटलमध्ये आणण्य़ात आला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमामवर बॅरिऍट्रिक सर्जरी केली जाणारय. इमामसाठी हॉस्पिटलमध्ये विशेष बेड तयार करण्यात आलाय. सुमारे 2 कोटींचा खर्च करून एका खोलीतच तिच्यासाठी सुसज्ज हॉस्पिटल तयार करण्यात आलंय. या एका खोलीच्या हॉस्पिटलचा प्रत्येक दरवाजा 7 फूट रुंदीचा आहे. या खोलीत आयसीयूपासून डॉक्टरांसाठीच्या विशेष खोलीपर्यंतच्या सर्व सुविधा आहेत. 


इमाम आता मुंबईत सुमारे 6 महिने असेल. सकाळी साडेसहाच्या सुमाराला क्रेनच्या मदतीनं इमामला बेडवर ठेवण्यात आलं. तिच्यासोबत इजिप्तहून तिची बहीण आणि 4 डॉक्टर मुंबईत आलेयत. डॉ मुफज्जल लकडावाला तिच्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत. 


इमामच्या मदतीसाठी ऑनलाईन कॅम्पेनही चालवण्यात आलं होते. ट्विटरच्या माध्यमातून इमामनं डॉ लकडावाला यांना आपल्यावर उपचार करण्याबाबत विचारणा केली होती. 36 वर्षीय इमाम गेल्या 25 वर्षांत घराबाहेरही प़डली नव्हती. वाढत्या वजनामुळे तिनं साधं सुर्यकिरणही येवढ्या वर्षांत पाहिलं नव्हतं.