कोलंबो : बोल्ड झाल्यानंतरही डीआरएस घेण्याचा पराक्रम बांग्लादेशचा बॅट्समन सोम्या सरकारनं केला आहे. या निर्णयामुळे सरकारची सोशल नेटवर्किंगवर खिल्ली उडवली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये सरकार बोल्ड झाला, पण आपण बोल्ड झाल्याचं सरकारच्या सुरुवातीला लक्षातच आलं नाही. अंपायरनं आऊट दिल्यानंतर त्यानं डीआरएस घेण्याचा इशारा अंपायरकडे केला.


बोल्ड झाल्यानंतर डीआरएस घेणारा सौम्य सरकार हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या मॅचमध्ये बांग्लादेशचा २५९ रननं पराभव झाला आहे.


पाहा नेमकं काय केलं सौम्य सरकारनं