पुणे :  शरीरसौष्ठव स्पर्धेला अधिक प्रोत्साहन देण्याच्या हेतूने तसेच खेळाडूंना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी स्वयंभू फाऊंडेशनच्या वतीने 23 एप्रिलला भारतातील सर्वात प्रतिष्ठीत अशी स्वयंभू श्री २०१६ ही शरीरसौष्ठव स्पर्धा पुण्याच्या सणस ग्राऊंडवर होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील ३० अव्वल आणि विख्यात शरीरसौष्ठवपटूंचा यात सहभाग असेल. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंवर तब्बल २४ लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव होणार असल्याची माहिती स्वयंभू फाऊंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ शिरोळे


हनुमान जयंतीच्या निमित्ताने शरीरसौष्ठवपटूंसाठी काही वेगळं आणि भव्य दिव्य करण्याच्या प्रामाणिक हेतूनेच स्वंयभू श्रीचे आयोजन करण्याची कल्पना स्वयंभू फाऊंडेशनला सुचली. या संकल्पनेमुळेच विजेत्या खेळाडूला सहा लाखांचे बक्षीस तर शेवटचा अर्थात तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूला २० हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे.


शरीरसौष्ठव खेळाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा पुरस्कार असल्याचेही सिद्धार्थ शिरोळे यांनी यावेळी सांगितले. या स्पर्धेनंतर पुण्यातील एक मोठा तरूण वर्ग फिटनेसकडे आकर्षिला जाईल, असा विश्वासही शिरोळे यांनी यावेळी व्यक्त केला. 


तसेच स्वयंभू श्रीच्या दिव्यांगाच्या गटात अव्वल पाच खेळाडूंना सन्मानित केले जाणार असून विजेत्या खेळाडूसाठी दिला जाणार पुरस्कार संस्मरणीय असेल. स्पर्धेत विजेता लखपती तर उपविजेता पाऊण लाखांचा मानकरी ठरेल. या स्पर्धेत दिव्यांग शरीरसौष्ठवपटू दीपंकर सरकार, गोपाल साहा, राजन नंदा सहभागी होणार आहेत.